वंदे किसान सोहळा
शेतकऱ्यांना शिक्षित आणि उन्नत करण्यासाठी भारतातील पहिले डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच वंदे किसान मोबाईल ॲप. वंदे किसानचे विमोचन २ डिसेंबर २०२१ रोजी कृषी शिक्षण दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. भगतसिंग कोश्यारी ह्यांच्या शुभ हस्ते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार जी ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे झाले.