प्रशिक्षक भागीदार


शिक्षण देणे हे एक उत्तम कार्य आहे.


वंदे किसान सोबत, ते फायद्याचे देखील आहे !

 

शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याच्या यज्ञात तुमचे स्वागत आहे !!


समाजात कोणताही बदल घडवायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि ह्या बाबतीत कृषी क्षेत्र देखील अपवाद नाहीये. परंतु आज देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. बदलते हवामान, बदलत्या मागण्या, बदलत्या बाजारपेठा, जोड उदयोग-धंदे ह्या सगळ्यापासून ते दूर आहेत. ह्या समस्येचे निराकरण करण्यासाठी वंदे किसानच्या माध्यमातून तुमचं ज्ञान, अनुभव हे शेतकऱ्यापर्यंत डिजिटल माध्यमातून पोहचवून शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतातील व परदेशातील कृषी विद्यापीठे, विविध कृषी तज्ञ आमच्या सोबत असून तुम्ही देखील ह्या यज्ञात सहभागी होऊ शकता. ज्यातून तुम्हाला मिळेल प्रसिद्धी, पैसा व त्याहून महत्वाचं म्हणजे समाधान.


प्रशिक्षक व्हा आणि जीवन बदला


नोंदणीसाठी येथे क्लिक करा


का सहभागी व्हावे?

तुम्हाला कृषी संबंधित ज्या विषयाचे ज्ञान व अनुभव आहे ते शेतकऱ्यांना, ग्रामीण तरुणांना शिकवा आणि शिकणाऱ्यांना नवी दिशा, आत्मविश्वास द्या. शात्रोक्त शेती केल्याने, जोड व्यवसाय केल्याने त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. ज्यामुळे शेतकरी कुटुंबाचे उत्पन्न काही प्रमाणात वाढण्यास तुमचा हातभार लागेल.
वंदे किसान परिवारात देशातील अनेक अनुभवी व कृषी तज्ञ मंडळी जोडलेल्या आहेत. ज्यातून तुमचं स्वतःच नेटवर्क वाढून आणखी काही नव्या संधी तुमच्यापर्यंत येतील.
सदरील प्रशिक्षण हे पूर्ण पणे डिजिटल स्वरूपात असल्याने तुम्ही तुमच्या वेळेनुसार, सवडीनुसार शिकवू शकता. एकदा रेकॉर्ड केलेला कार्यक्रम अनेकदा विद्यार्थी बघू शकतात, शिकू शकतात.
डिजिटल स्वरूपातील व्यासपीठ असल्याने विद्यार्थी हे फक्त तालुका किंवा जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण राज्य किंवा देशभरातून विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहचू शकतात.
तुमचा कोर्स किती जणांनी विकत घेतला आहे, ह्या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती, आर्थिक व्यवहार हे संपूर्णपणे पारदर्शक असून रियल टाइम अपडेट केले जातात. त्यामुळे तुमच्या कोर्सची विक्री व त्यातून तुम्हाला मिळणारे आर्थिक मानधन हे पूर्णपणे पारदर्शक आहे.
तुम्ही बनविलेल्या प्रत्येक सशुल्क कोर्सचे मानधन तर तुम्हाला मिळणारच आहे परंतु त्या व्यतिरिक्त देखील असे तज्ञ ज्यांच्या कोर्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे, अश्या तज्ञ मंडळींना आकर्षक भेट वस्तू देखील दिल्या जातील.


सुरुवात कशी करावी ?

तुम्हाला तुमच्या कोर्सच्या विषयावर खरोखर थोडा विचार करायचा आहे. तुम्हाला ज्या विषयाची जाण आहे आणि ज्याची आवड आहे अशा विषयापासून सुरुवात करा. तुमचं ज्ञान, अनुभव व शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी असलेली गरज लक्ष घेऊन तुम्ही तुमच्या कोर्सचा विषय ठरवू शकता. कोर्स तपशीलवार जरी असला तरी त्यामधील अनावश्यक व कंटाळवाण्या गोष्टी असल्यास तळव्यात टाळाव्यात. मुद्धेसुद मांडणी असावी. तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहात आणि त्यांना काय शिकण्यात रस आहे याचा विचार करा.
वंदे किसान सोबत तुम्ही तुमचा विषय निवडताना, तुमच्या विषयाला नेमकी मागणी आहे का हे तपासा.
तुमचा कोर्स अत्यंत साध्या भाषेत, समजायला सोपा, तांत्रिक शब्द टाळून सामान्यांना कळेल अश्या शुद्ध भाषेत असावा. प्रशिक्षणात विषय सोप्पा करण्यासाठी उदाहरण देऊन सांगितल्यास विद्यार्थ्यांना कळायला सोपे जाते. व्याख्यान हे विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढविणारे असावे.
तुमचा पहिला कोर्स बनविण्यासाठी तुम्ही निश्चित रहा. आमचे एक्सपर्ट्स तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. तुम्ही तुमचा कोर्स तुमच्या सोयीच्या ठिकाणी स्मार्टफोनच्या माध्यमाने शूट करू शकता. व्हिडिओ बनविण्याकरिता तुम्हाला सर्व माहिती, सहकार्य दिले जाईल. सशुल्क कोर्ससाठी किमान दोन तास किंवा अधिक वेळेचा कोर्स व्हिडिओ असण्याची शिफारस करतो.
आमची सपोर्ट टीम तुम्हाला संपूर्ण प्रक्रियेदरम्यान मदत करण्यासाठी आणि चाचणी व्हिडिओंवर फीडबॅक देण्यासाठी उपलब्ध आहे.
आमची प्रशिक्षक सपोर्ट टीम तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि तुमच्या चाचणी व्हिडिओचे पुनरावलोकन करण्यासाठी तयार आहे.
तुमचे व्याख्यान शूट केल्यानंतर त्यावर आमच्या एक्सपर्ट्स कडून प्रक्रिया केली जाते. विविध फुटेजेस, ग्राफिक्स वापरून व्हिडिओ अधिक आकर्षक बनवला ज़ातो. अंतिम व्हिडिओ तपासणींनंतर वंदे किसान ऍपवर अपलोड केला जातो.
तुमचा कोर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे ही वंदे किसानची जबाबदारी आहे. आमच्याकडे असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या फोन क्रमांकांवर त्यांना संदेश पाठवून तसेच इमेलद्वारे, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब सारख्या सर्व सोशल मीडियावर प्रसिद्धी करणे हे आमचे कर्तव्य आहे. अर्थात, तुम्ही तुमच्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तुमच्या परीने प्रयत्न केल्यास त्याचा फायदाच होणार आहे. त्याच बरोबर वंदे किसान चे मोबाईल ॲप व वेबसाईटवर देखील प्रसिद्धी केली जाईल.
तुमचा कोर्स यशस्वी होण्यासाठी उच्च रेटिंगचे लक्ष्य ठेवा. जास्तीत जास्त रेटिंगसाठी, तुमच्या विद्यार्थ्यांकडून उच्च रेटिंग मिळाल्यास तुमचा अभ्यासक्रम इतरांपेक्षा वेगळा असल्याचे सूचित करते. तुमचे रेकॉर्डिंग उच्च-गुणवत्तेचा अनुभव देते आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करते. याची खात्री करण्यासाठी चाचणी व्हिडिओ आमच्या तज्ञांकडे सबमिट करा. आमच्या कोर्स क्वालिटी चेकलिस्ट आणि विद्यार्थी अनुभव चेकलिस्टवरील सर्व शिफारसी तुम्हाला सुचवल्या जातील.

तुमचा कोर्स इतरांपेक्षा वेगळा करण्याचा एक मार्ग म्हणजे कोर्स फिल्डवर शूट करण्याचा विचार करू शकता. तुमच्या विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणारा कोर्स तयार करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

तुमचा कोर्स यशस्वी होण्यासाठी विपणन धोरण ठेवा. विद्यार्थ्यांना तुमच्या अभ्यासक्रमाकडे नेण्यासाठी प्रभावी विपणन धोरण असावे. कोर्स विक्री वाढवण्यासाठी YouTube, Facebook किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ठळकपणे माहिती उपलब्ध करून देऊ शकता.


वंदे किसान प्रशिक्षक भागीदार कार्यक्रमाबद्दल

वंदे किसान प्रशिक्षक भागीदार कार्यक्रम हा व्यवसायिक प्रशिक्षकांसाठी व्यावसायिक कार्यक्रम आहे. प्रशिक्षकांना त्यांचे ज्ञान, अनुभव चांगल्याप्रकारे पुढे नेण्यासाठी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक संधी आहे.



अर्ज प्रक्रिया


प्रशिक्षक भागीदारसाठी कोण पात्र आहे?

  • 1. कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठात सध्या कार्यरत किंवा निवृत्त प्राध्यापक, वैज्ञानिक, अधिकारी.
  • 2. प्रगतिशील किंवा प्रयोगशील शेतकरी
  • 3. कृषी पदवीधर / पदव्युत्तर
  • 4. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम असलेल्या व्यक्ती


मी प्रशिक्षक भागीदारसाठी अर्ज कसा करू शकतो?

वंदे किसान च्या मोबाईल ऍप किंवा वेबसाइटवरून तुम्ही कधीहि अर्ज करू शकता. वंदे किसान च्या तज्ञांची समिती अर्जाचे पुनरावलोकन करते. ज्या प्रशिक्षकांना ते या कार्यक्रमासाठी पात्र आहेत त्यांच्याशी पुढील संपर्क साधून काही औपचारिकता पूर्ण केल्या जातात. कार्यक्रमाची क्षमता मर्यादित आहे तसेच ह्या कार्यक्रमाची गुणवत्ता राखण्यासाठी मर्यादित प्रशिक्षकांनाच प्रवेश दिला जाईल.


अर्ज पुनरावलोकन प्रक्रिया काय आहे?

पुन्हा अर्ज करण्यास आम्ही प्रोत्साहित करतो. तुमची निवड न झाल्यास ६ महिन्याने तुम्ही पुन्हा अर्ज करू शकता. तुमच्या अर्जाचे पुनरावलोकन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल ईमेल अपडेट प्राप्त होईल.


प्रशिक्षक भागीदारसाठी कार्यक्रम विनामूल्य आहे का?

होय! हा कार्यक्रम विनामूल्य आणि पात्रता असलेल्या सर्व प्रशिक्षकांसाठी आहे.


प्रिमिअम प्रशिक्षक भागीदार काय आहे आणि तो प्राप्त करण्यास कोण पात्र आहे?

वंदे किसान - प्रीमियम प्रशिक्षक भागीदार निवडक प्रशिक्षकांसाठी आहे. थोडीशी गुंतवणूक करून तुम्ही अधिक फायदा मिळवू शकता. प्रिमिअम प्रशिक्षक भागीदार बॅज प्राप्त करण्यासाठी, प्रशिक्षकांना वंदे किसानच्या तज्ञ समितीने निवड करणे गरजेचे आहे. प्रोग्राममध्ये स्वीकृत झाल्यानंतर प्रशिक्षकांना प्रिमिअम बॅज कसा मिळवायाचा याविषयी विशिष्ट तपशील प्रदान केले जातात.


रेकॉर्डिंग सुरू करण्यापूर्वी

तुम्ही तुमचा कोर्स रेकॉर्ड करण्यापूर्वी, एक माहिती पुस्तिका तुम्हाला दिली जाईल ज्यामुळे कोर्स रेकॉर्ड करणे तुम्हाला सोपे जाईल.


चाचणी व्हिडिओ सेवा

तुमच्या व्हिडिओ, ऑडिओ टोन आणि डिलिव्हरीवर फीडबॅकसाठी ५ मिनिटांचा नमुना व्हिडिओ सबमिट करा. आमचे तज्ञ तो पडताळून तुम्हाला योग्य त्या सुचना व मदत करतील.



नोंदणीसाठी येथे क्लिक करा